यशासाठी.... सर्व काही
यशासाठी.... सर्व काही आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वांनाच यशस्वी व्हायचं असतं, पण यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माहीत नसतो.. मग लोक शॉर्टकट च्या नादात स्वतःचा वेळ पैसा याचे नुकसान करून बसतात. म्हणून जीवनाचा प्रवाह कोणत्या दिशेला न्यायचा हे आपणच ठरवायचे असते. शेवटी काय तर यशाच्या मार्गाला शॉर्टकट नसतो. काही लोक म्हणतात यश हे तुमच्या नशिबावर अवलंबून आहे तर असे नाही जीवनाचे यश हे तळहाताचा रेषेवर नसून मनगटात आपल्या कष्टावर अवलंबून आहे. " कुंडलीतल्या ग्रहताऱ्यांची नको तपासू स्थान गती मनगट ज्याचे कणखर त्याचे नशीब नाही तळहाती शिंपण करता घामाचे तारा नशिबाचा चमचमतो " एखाद्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करणे हेच यशाचे रहस्य आहे. आपल्या प्रयत्नात सातत्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्यातच कर्तुत्व आहे आणि असाध्य ते साध्य करण्याची जिद्द बाळगली तर यश नक्कीच मिळते.... √ यशाचे २१ मूलम...