करिअर बाबतचे निर्णय घेताना..
करिअर बाबतचे निर्णय घेताना.. जीवनातील महत्त्वाचा भाग असतो करिअर.. करिअरचा टर्निंग पॉइंट दहावी, बारावीच्या परीक्षा... करिअर निवडताना बरेच विद्यार्थी confuse असतात त्यांना योग्य प्रकारे माहिती नसते मग पालकच मुलांचे करिअर ची निवड करताना दिसतात. यात पालकांचा दोष नाही, हा समाजात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम आहे. लोकांचं पाहून पालकांनाही वाटते आपल्या मुलाने किंवा मुलीने ही यात करिअर करावे उदा .जोशीकाकांचा मुलगा रमेश इंजिनियर झाला आणि आता तो चांगल्या पोस्टला भरमसाठ पगारावर काम करतो आहे. रमेश यशस्वी झाला मग आपला मुलगा पण होईल असा विचार करून आपल्या मुलाला ही ते इंजिनिअर ला टाकतात. तो करतो मग मलाही जमेल म्हणून करिअरच्या क्षेत्रात उडी घेतली की, नाहीच जमले तर नैराश्याचे बळी ठरतो.या सगळ्यात खूप पैसे खर्च केलेले असल्यामुळे निवडलेले करिअर सोडताही येत नाही आणि आवडीने अनुभवता येत नाही तेव्हा जीवन पूर्णपणे उदास होऊन जाते. म्हणून आधीच आपल्या क्षमता, आवड ...