करिअर बाबतचे निर्णय घेताना..

          करिअर बाबतचे निर्णय घेताना..


जीवनातील महत्त्वाचा भाग असतो करिअर..
 करिअरचा टर्निंग पॉइंट दहावी, बारावीच्या परीक्षा...
                    करिअर निवडताना बरेच विद्यार्थी confuse असतात त्यांना  योग्य प्रकारे माहिती नसते मग पालकच मुलांचे करिअर ची निवड करताना दिसतात. यात पालकांचा दोष नाही, हा समाजात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम आहे. लोकांचं पाहून पालकांनाही वाटते आपल्या मुलाने किंवा मुलीने ही यात करिअर करावे उदा.जोशीकाकांचा मुलगा रमेश इंजिनियर झाला आणि आता तो चांगल्या पोस्टला भरमसाठ पगारावर काम करतो आहे. रमेश यशस्वी झाला मग आपला मुलगा पण होईल असा विचार करून आपल्या मुलाला ही ते  इंजिनिअर ला टाकतात.  तो करतो मग मलाही जमेल म्हणून करिअरच्या क्षेत्रात उडी घेतली की, नाहीच जमले तर नैराश्याचे बळी ठरतो.या सगळ्यात खूप पैसे खर्च केलेले असल्यामुळे निवडलेले करिअर  सोडताही येत नाही आणि आवडीने अनुभवता येत नाही तेव्हा जीवन पूर्णपणे उदास होऊन जाते. म्हणून आधीच आपल्या क्षमता, आवड ओळखून वेळीच बिनधास्त आपल्या पालकांना समजून सांगा. आजचे पालकही मुलांना हवं ते करून देतात त्यांना support करतात.  "जे नको ते आणि जे हवं ते" वेळीच बोललं पाहिजे वेळ निघून गेली की शेवटी पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही.
                   प्रत्येकाने आपले करिअर निवडताना योग्य विचार करून निर्णय घेतला पाहिजे. आपल्याला काय आवडतं?आपली  ability किती? आपल्याला जमेल का? या क्षेत्रात competition किती आहे? असे अनेक प्रश्न आपल्या मनाला विचारूनच कोणताही निर्णय घ्यावा. करियर तुमचं असतं. तुमची आवड, तुमची मेहनत खूप महत्त्वाची असते. ज्याला successful व्हायच आहे त्यांनी करिअर निवडीवर विचार करणे खूप गरजेचे आहे. 
                    जन्माला येताना प्रत्येक जण कोणते ना कोणते वरदान घेऊनच येतो. प्रत्येक जण unique असतो. प्रत्येक जण प्रतिभावंत असतो.प्रत्येकात कल्पकता असते प्रत्येकात कुठली ना कुठली शक्ती असते. कला, कौशल्य असते.          साहित्य,कला,विज्ञान,खेळ,व्यवसाय, व्यापार, समाजकारण, राजकारण प्रत्येक क्षेत्रात नवे विचार, नवी कल्पना, नवी प्रतिभा घेऊन पुढे पाऊल टाकणारे नवनिर्माण करू शकतात. तरीही काही माणसे सामान्य जीवन जगतात तर काही असामान्य होतात. स्वतःतले गुण प्रयत्नपूर्वक शोधून तिचा उपयोग करतात, ती असामान्य ठरतात. आपल्यातल्या गुणांची जाणीवच ज्यांना होत नाही, ती माणसे जन्माला आली म्हणून जगत असतात आणि सामान्यच राहतात. कल्पनाशक्ती आणि निर्मिती क्षमता या दोन दुर्मिळ मौल्यवान गोष्टी आहे. निसर्ग प्रत्येकाला देत असतो. त्याचा वापर कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. या गोष्टींचा वापर करण्यापूर्वी त्यांचा विकास सुद्धा करायचा असतो.
                    बहुतेक जणांना आपला इंटरेस्ट कशात आहे हे लवकर कळतही नाही..
 ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्याची सतत practice केली की आपण त्यात निपून होतो. आणि जेथे talent आहे तेथे scope असतोच..
                  *महत्वाच्या टिप्स*
  • ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही तेथे जास्त concentration करावं लागतं.
  • ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तिथे concentration करावं लागतं नाही तर ते आपोआप होत.
  • जेथे competition जास्त आहे तेथे hard work करावं लागतं त्यापेक्षा competition  कमी आहे तेथे स्मार्ट वर्क करूनही तुम्ही टॉप levelला जाऊ  शकता.. 
  • एखादी गोष्ट मनापासून केली तर त्यातील कष्ट जाणवत नाही.
  • एखादी गोष्ट जाणीवपूर्वक करणे महत्त्वाचे त्यामुळे आयुष्याला दिशा मिळते.   ..मोहिनी😊

      Comments

Popular posts from this blog

यशासाठी.... सर्व काही

आजच्या तरुणांसाठी..